अचलबेट देवस्थान येथे श्री दत्त जयंती व गुरुवर्य उज्वलानंद महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
अचलबेट देवस्थान येथे श्री दत्त जयंती व गुरुवर्य उज्वलानंद महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बुधवारी सकाळी सुरूवात………कडाक्याच्या थंडीत 700 वाचकांची उपस्थिती.
उमरगा – उमरगा तालुक्यातील अचलबेट देवस्थान येथे श्री दत्त जयंती व गुरुवर्य उज्वलानंद महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बुधवार दि 20 रोजी सकाळी 7:30 वा. सुरूवात झाली आहे.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात व्यासपीठ सेवा हभप. श्री एकनाथ महाराज कोष्टी, हभप. माऊली महाराज कोल्हे आळंदी, हभप. ज्ञानेश्वर बरमदे महाराज यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी महीला व पुरुष मिळून तब्बल 700 वाचक ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी बसलेले आहेत.
पहाटे काकडा आरती हभप. पंढरी संत, बुध्दीवंत बिराजदार, शिवाजी जेवळे, दत्तात्रेय बरमदे यांनी केले, सकाळी 6 वा. विष्णू सहस्रनाम हभप. पांडुरंग कुलकर्णी, बालाजी मुळे, मुकुंद पाटील, गोविंद माने यांनी संपन्न केले. दुपारी गाथा भजन हभप. चंद्रशेखर महाराज सुर्यवंशी, सुर्यकांत कडदोरे, विश्वनाथ मोरे, ज्ञानेश्वर कुंभार, ईश्वर पाटील यांनी पार पाडले. तर सायंकाळी वारकरी भुषण हभप. प्रकाश महाराज बोधले डिकसळ यांचे किर्तन संपन्न होणार आहे.
देवस्थान परिसरात एका वेळेस जवळपास 15 ते 20 हजार भावीक जेवन करतील अशी व्यवस्था आहे. महाराष्ट्र – कर्नाटक राज्यातील तब्बल दहा तालुक्यातील ( महाराष्ट्र राज्यातील उमरगा, निलंगा, औसा, लोहारा, अक्कलकोट, तुळजापूर तर कर्नाटक राज्यातील भालकी,बसवकल्याण, हुमनाबाद, आळंद यासह इतरही ) भावीक भक्तांच्या सहकार्यातून हा महोत्सव सुरू आहे.या महोत्सवात पंचक्रोशीतील जवळपास दोनशे ते अडीचशे गावातील सदभक्त सहभागी झाले आहेत.
सर्वांनी या महोत्सवात सहभागी होऊन नामस्मरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष हभप. भिम महाराज, हभप. हरी गुरूजी, बबर माने, श्रीधर जाधव, सुरज राठोड, ललित पटेल, मोहन मोरे, जनार्दन भोसले, बाळू जांभळदरे, राजेंद्र माळी, अॅड. आगजी वडदरे, बाळू पाटील, ईश्वर माळी, ज्ञानेश्वर बरमदे, करबस शिरगुरे, शहाजी जाधव, विष्णू लवटे, उमाकांत सुर्यवंशी, पंडित मुळे, करण कुन्हाळे, जगन्नाथ मुगळे, विठ्ठल येरनाळे आदींनी केले आहेत.