उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान भव साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न
उमरगा – उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान भव कार्यक्रमांतर्गत साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यामध्ये असंसर्गजन्य आजार निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, किडनी आजार इ. तपासणी निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित नागरिकांना आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. कवठे, डॉ. जमादार मॅडम, रुग्णालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.