धाराशिव चे कलेक्टर बोगस नॉनक्रीमी लेअर प्रमाणपत्र जोडून सेवेत रुजू…लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली असल्याची बातमी समाजमाध्यमावर
धाराशिव – पूजा खेडकर नावाच्या आय ए एस महिला अधिकाऱ्याचा काही महिण्यापूर्वीपासून देशभरात विषय चर्चेत होता. हे प्रकरण ताजे असतानाच , धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याबद्दलही शंका आणि संशयाची सुई निर्माण झाली आहे. सत्यशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी डॉ. ओम्बासे यांच्यावर बोगस नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र जोडून सेवेत रुजू झाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या तक्रारीमुळे शासन आणि प्रशासकीय सेवेमधील प्रामाणिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
डॉ.ओम्बासे यांचे पार्श्वभूमी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आणि त्यातच ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यांच्या पालक उच्चशिक्षित असून, ते प्राध्यापक होते. मात्र, ओबीसीसाठी नॉनक्रीमी लेअर प्रमाणपत्र मिळविण्याच्या अटींची पूर्तता करण्यासाठी वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागते. परंतु, सुभेदार यांच्यानुसार, डॉ. ओम्बासे यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न बारा लाखांपेक्षा अधिक होते, ज्यामुळे त्यांना नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार नव्हता.
आयएएस होण्यासाठी साठी केली फसवणूक – डॉ. ओम्बासे यांनी २००९ ते २०१३ दरम्यान चार वेळा खुल्या प्रवर्गातून आयएएस परीक्षा दिली. मात्र, त्यांना पहिल्या तीनवेळा यश मिळाले नाही. चौथ्या वेळेस यश मिळाले , मात्र त्यांची आयपीएस साठी निवड झाली . डॉ. ओम्बासे यांना मात्रआयएएस व्हायचे होते, म्हणून त्यांनी आयपीएस पद स्वीकारले नाही. नंतरच्या प्रयत्नात खुल्या प्रवर्गातून अधिक परीक्षा देण्याची मर्यादा ओलांडली असल्यामुळे त्यांनी ओबीसी प्रवर्गातून परीक्षा दिली आणि अखेर २०१४ मध्ये आयएएस साठी निवड झाली.
त्यांच्या पालकांच्या उत्पन्नाच्या आधारावर, त्यांनी ओबीसी नॉन क्रीमी लेअरचे प्रमाणपत्र कसे मिळविले? सुभेदार यांच्या मते, डॉ. ओम्बासे यांनी शासन आणि लोकसेवा आयोगाची फसवणूक केली आहे. याबाबत त्यांनी लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली आहे. अश्या बातम्या समाज माध्यमावर पसरत आहेत.