उमरगा – लोहारा तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांसाठी ५ कोटी रू मंजुर.आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती…
उमरगा – लोहारा तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांसाठी ५ कोटी रू मंजुर.आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती.
उमरगा – विधानसभा मतारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये बौध्द विहार बांधकाम, समाजमंदिर बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, समाजमंदिरास संरक्षक भिंती, अंतर्गत रस्ते, आदी ३७ गावांमधील ३९ कामांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२४-२५ अंतर्गत सुमारे ५ कोटी रू. निधी मंजुर झाल्याची माहिती आ.ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.
या कामांना निधी मंजुर होण्यासाठी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्यास यश आले आहे. या कामासाठी निधी मंजुर केल्याबददल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच याकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबददल माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांचे आ.चौगुले यांनी आभार मानले आहेत.
या गावात झाले कामे मंजुर येळी ता.उमरगा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – ५० लक्ष रू., कसगी ता.उमरगा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – ३० लक्ष रू., बेडगा ता.उमरगा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – २० लक्ष रू., केसरजवळगा ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत वाचनालय बांधणे – २० लक्ष रू., कदेर ता.उमरगा येथे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १५ लक्ष रू., जकेकुरवाडी ता.उमरगा येथे अण्णाभाऊ साठे नगरमध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., कवठा ता.उमरगा अण्णाभाऊ साठे नगर येथे समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., नाईचाकूर ता.उमरगा येथे अण्णाभाऊ साठे नगर येथील समाजमंदिरास संरक्षक भिंत बांधकाम करणे – १० लक्ष रू., येणेगूर ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत बाबा नगरमध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., डिग्गी ता.उमरगा येथील समाजमंदिरास संरक्षक भिंत बांधकाम करणे – १० लक्ष रू., दाळिंब ता.उमरगा येथे व्होलार मातंग समाज स्मशानभुमीचे बांधकाम करणे – १० लक्ष रू., दाबका ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., आनंदनगर ता.उमरगा येथे समाजमंदिरास संरक्षक भिंत व अनुषंगीक कामे करणे – १० लक्ष रू., आष्टा का. ता.लोहारा येथे बुध्द विहार परिसर विकास व अनुषंगीक कामे करणे – १० लक्ष रू., चंडकाळ ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू.,एकुरगा ता.उमरगा येथे मागासवर्गीय स्मशानभुमी विकसीत करणे – १० लक्ष रू, तुगाव ता.उमरगा येथे मागासवर्गीय स्मशानभुमी विकसीत करणे – १० लक्ष रू., आष्टा ज. ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता / गटार बांधकाम करणे – १० लक्ष रू., कवठा ता.उमरगा येथे भीम नगर मधील समाजमंदिर परिसर विकास व अनुषंगीक कामे करणे – १० लक्ष रू., एकोंडी ज. ता.उमरगा येथे अण्णाभाऊ साठे नगरमध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., कुन्हाळी ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत पाण्याची टाकी बांधकाम व अनुषंगीक कामे करणे – ५ लक्ष रू., चिंचकोटा ता.उमरगा येथे मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., दाळींब ता.उमरगा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – २० लक्ष रू., मौजे.कलदेव निंबाळा ता.उमरगा येथे चर्मकार समाज वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., पेठसांगवी ता.उमरगा येथे चर्मकार समाज वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू. , होळी ता.लोहारा येथे समाजमंदिराची दुरूस्ती, संरक्षक भिंत व अनुषंगीक कामे करणे – २० लक्ष रू., अचलेर ता.लोहारा येथे चर्मकार समाज वस्तीत समाजमंदिर बांधणे – १० लक्ष रू., भातागळी ता.लोहारा येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिरास सरंक्षक भिंत बांधकाम करणे – १० लक्ष रू., माकणी ता.लोहारा येथे रोहिदास नगर मध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., माकणी ता.लोहारा येथे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू., खेड ता.लोहारा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – १० लक्ष रू., हिप्परगा रवा ता.लोहारा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – १५ लक्ष रू., माळेगाव ता.लोहारा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – १० लक्ष रू. , नागूर ता.लोहारा येथे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये समाजमंदिर बांधणे – १० लक्ष रू., हिप्परगा सय्यद ता.लोहारा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – १० लक्ष रू., हंद्राळ ता.उमरगा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – १० लक्ष रू., कदेर ता.उमरगा येथे मागासवर्गीय स्मशानभुमी विकसीत करणे – १० लक्ष रू., चिंचोली भु. ता.उमरगा येथे बुध्द विहार बांधकाम करणे – १० लक्ष रू., मळगी ता.उमरगा येथे अण्णाभाऊ साठे नगरमध्ये समाजमंदिर बांधकाम करणे – १० लक्ष रू. या कामांचा समावेश आहे.