आरपीआई (आंबेडकर) चा सत्ता परिवर्तन मेळावा संपन्न….


आरपीआई (आंबेडकर) चा सत्ता परिवर्तन मेळावा संपन्न….

Advertisement

अहमदनगर – श्रीगोंदा येथील बालाजी मंगल कार्यालयात उत्साहात सत्ता संपादन मेळावा संपन्न झाला. यावेळी RPI आंबेडकरवादी पक्षाचे अध्यक्ष दीपक निकाळजे उपस्थित होते. अहमदनगर दक्षिण चे अध्यक्ष निलेश गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून घनशाम शेलार व मा. जि.प.सदस्य , अनिल ठवाल, मुकुंद सोनटक्के, रावसाहेब हरिभाऊ पोडके, कांतीलाल कोकाटे, निशांत लोखंडे व इतर पदाधिकारी तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (A) चे महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा. संतोषबापु गलांडे, महाराष्ट्र सचिव मा. अशोकजी ससाणे, केंद्रीय कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे, महाराष्ट्र संघटक, कैलासजी जोगदंड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, सरचिटणीस प्रवीण जगधने , पुणे जिल्हा अध्यक्ष सचिनभाऊ खरात, जिल्हा संपर्क प्रमुख रोहित आव्हाड , युवा जिल्हा संपर्क प्रमुख विलास कांबळे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष उत्तर अमोन शिंदे तसेच प्रदीप मकासरे, रॉकी लोंढे, हरिष आल्हाट, दिनेश पंडित, जॉन पाटोळे, संदिप वाघमारे, दादा घोडके, परशुराम घोडके, भगवान गजरमल, युवराज शिंदे, युवराज शिंदे, राहुल छत्तीसे, करण चव्हाण, अजित भोसले, कमलाकर आल्हाट, अक्षय लगाडे, वैभव रणसिंग, विवेक घोडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री.निकाळजे आपल्या भाषणात बोलत असताना म्हणाले की, येत्या काळात अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) हा पक्ष मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करत असून पुढील राजकीय घडामोडीत भरीव कामगिरी करणार असून नेहमीच संविधान वाचवणे तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात जाहीर भूमीका घेऊन गरीब, आदिवासी, दिनदुबळ्या, अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पक्षामार्फत करणार असल्याचे ते म्हणाले तसेच येत्या काळात अ.नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांच्या हातून पक्ष हिताचे व समाजहिताचे कार्य घडेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीगोंदा तसेच परिसरात परिसरारील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »