गुंजोटी येथे टी. एस. व मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
उमरगा – उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील समर्पण सामाजिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्यातील विविध शाळेतील ए.टी. एस. व मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवार (दि. २८) सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी युवानेते अजिंक्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अविनाश रेणके, शेतकरीसेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, शेतकरीसेना तालुकाप्रमुख विजय तळभोगे, आलूरचे उपसरपंच जितेंद्र पोतदार, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ भालके यांची प्रमुख उपस्थिती होती. गुंजोटीचे माजी सरपंच तथा संस्थेचे संस्थापक विलास व्हटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध शाळेतील पहिले ते सातवी वर्गाच्या ९७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना विलास व्हटकर यांनी गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने राबवितो असे सांगितले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अजिंक्य पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे हे काम असेच अविरत सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी युवासेना उपतालुकाप्रमुख महेश शिंदे, कोराळचे ग्राप सदस्य अण्णाराव माने, येळी गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष जाधव, गुंजोटी शिवसेना विभागप्रमुख विजय स्वामी, गुंजोटी शाखाप्रमुख विजय शिंदे, भुसनी शाखाप्रमुख युवराज मंडले, जगदीश पाटील, सोसायटी संचालक माधव पाटील, येणेगुर गावचे शाखाप्रमुख आकाशराजे कांबळे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख श्रीकर बिराजदार, आदीनाथ काळे, दयानंद वाडीकर विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी साईराज कटकधोंड, इम्रान मुजावर, विक्रम व्हटकर, शेखर कटकधोंड, स्वप्नील कटकधोंड, विवेक व्हटकर, विशाल व्हटकर, महेश कटकधोंड यांनी पुढाकार घेतला.