उमेदवार म्हणून सातलिंग स्वामी यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे करा…
उमेदवार म्हणून सातलिंग स्वामी यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे करा…खासदार ओमप्रकाश निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना विविध गावाच्या समर्थकांनी घातले साकडे…!
उमरगा – उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ईच्छुक असलेले, जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागातील अनुभवाबरोबरच अनेक मंत्र्यांचे स्वीय सहायक म्हणून मंत्रालयात शासकिय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा दांडगा अनुभव असल्याने असा व्यक्तिच भावी आमदार म्हणून लाभल्यास उमरगा-लोहारा मतदारसंघाचा भरघोस विकास होऊ शकतो. त्यामुळे ईच्छूक उमेदवार सातलिंग स्वामी यांनाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी सातलिंग स्वामी समर्थकांनी खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष भेटून केली.
जर सातलिंग स्वामी यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी नाही दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही सातलिंग स्वामी समर्थकांनी यावेळी दिला.
यावेळी उमरगा-लोहारा मतदारसंघातील उमरगा शहरासह कदेर, कसगी, माडज, येळी, जकेकूर, केसरजवळगा, नारंगवाडी, मुरूम, मुळज, त्रिकोळी, मातोळा, होळी, एकोंडी ( लो ), कवठा, डाळिंब, भुसणी, आचलेर, आलूर, बेळंब, कंटेकुर, आष्टा कासार, भोसगा, दस्तापुर, विलासपूर पांढरी, जेवळी ( द ), जेवळी ( उ ), लोहारा, नागूर, कास्ती, कानेगाव, तोरंबा, होळी, हराळी, तावशी, सालेगाव, कलदेव निंबाळा, वडगाव ( गां ), वरनाळवाडी, दाबका, तुरोरी, तलमोड, कोराळ, कुन्हाळी, गुगळगाव, वागदरी, सावळसुर, बाबळसुर, कोरेगाव, पेठसांगवी, माकणी, सास्तुर, तुगाव, शिवाजीनगर तांडा, रामपूर, बलसूर, नाईकनगर आदी गावातील जंगम व लिंगायत समाजासह अठरापगड जाती – धर्माचे मतदार नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.