आमदार चौगुलेची डोकेदुखी वाढणार….माजी आरोग्य उपसंचालक बी. पी. गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात… शिवसेना उबाठा पक्षाकडून कडून निवडणूक लढवणार…!
आमदार चौगुलेची डोकेदुखी वाढणार….माजी आरोग्य उपसंचालक बी. पी. गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात…
शिवसेना उबाठा पक्षाकडून कडून निवडणूक लढवणार !
उमरगा – प्रतिनिधी :- उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून मला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे. माजी आरोग्य उपसंचालक डॉ.बी पी गायकवाड यांनी उमरगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत श्री गायकवाड पुढे म्हणाले की, 2009 साली काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती 65 हजार मते मला मिळाले होते. अल्पमताने माझ्या पराभव झाला असल्याने मी खचून न जाता सामाजिक कार्य केले आहे 2014 व 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे उमेदवारासाठी मागणी केली होती परंतु पक्षांतर्गत विरोध झाल्यामुळे मला उमेदवारी मिळू शकली नाही त्यामुळे मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मतदारांना माझ्या नावाचा कामाचा अनुभव असल्याने मला उमेदवारी मिळाल्यास सहज विजय होईल असे सांगून ते पुढे म्हणाले की मला प्रशासकीय सेवेतील 32 वर्षाचा अनुभव आहे शासनाच्या योजना निधी तसेच प्रचार यंत्रणा याची माहिती आहे या भागात मोठा निधी मिळाला असे म्हणत असले तरी सत्ताधाऱ्यांना हा निधी मिळतोच.त्यामुळे एवढा मोठेपणा गाजवायची काही गरज नसते.
राज्यातच नव्हे तर देशात भाजपाने पक्षफोडी व घराघरात भांडण लावून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न दिवसेंदिवस अपयशी ठरत आहे. चारशे रुपयांचे गॅस सिलेंडर आज अकराशे रु. झाले आहे चहावर ही जीएसटी लागू केली आहे. यातून लाडकी बहिणीवर खर्च केला परंतु यासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली आहे. मध्यप्रदेश सरकारने अशी योजना निवडणूक झाल्यावर बंद केली आहे . 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपयश मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असून लोकसभा निवडणुकीत या तालुक्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठी लीड दिली आहे याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे त्यामुळे माझी हुकलेली विजयाची संधी या निवडणुकीत यश मिळवून देईल यासाठी पक्षाने मला उमेदवारी द्यावी असा आशावादी त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, माजी समाजकल्याण सभापती हरीश डावरे, राजू भालेराव आदी उपस्थित होते.