भाजप जिल्हा उपाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात ; उमरगा विधानसभा लढण्याचा निर्धार…!


भाजप जिल्हा उपाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात…

 

उमरगा  – तालुक्यात मागील 25 वर्ष समाजकारण, राजकारण केले . एक वेळेस विधानसभा निवडणूकही लढवली होती .मात्र  कार्यकर्ते , समर्थक व जनतेच्या आग्रहाखातर उमरगा- लोहारा विधानसभेची निवडणूक भाजपपक्षा कढुन लढणार तर उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढविणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष भाजप जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी दि .२४ रोजी उमरगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले .
            येथील शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. शिंदे म्हणाले की गेली २५ वर्ष ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण करून सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे .जिल्हा परिषद सदस्य असताना तालुक्यात अनेक मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार बांधकामासाठी प्रयत्न केले सर्व जाती धर्मातील लोकांचा रेटा वाढत असल्यामुळे ही निवडणूक लढविण्याचा माणस आहे .मुस्लिम समाजातील अनेक लोकांनी येऊन पाठिंबा जाहीर केला आहे . भाजपा पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार आहे पण उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्यास मी तयार आहे . १४ साली विधानसभा निवडणूक लढवली होती .त्यात थोडक्या मताने पराभव झाला होता . त्यानंतर सातत्याने अनेक वर्ष जनतेची कामे करीतच आहे .गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यात भेटीसाठी सुरू केल्या आहेत यात लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे . ही निवडणुक जनतेनी हातात घेतली आहे .

Advertisement

तालुक्याचा विकास झाला असे काहीजण सांगत असले तरी तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत राष्ट्रीय महामार्ग, एमआयडीसी , बेरोजगारी, गुन्हेगारी,पाण्याचा प्रश्न असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की अजूनही दररोज सर्वसामान्यांची छोटी मोठी कामे करत आलो आहे . जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे . याचा निवडणूक विजयी होण्यासाठी मला मोठा फायदा होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »