लातूर पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न झाल्यास राजकीय पक्षांनी आमची मते गृहीत धरू नये…


लातूर पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न झाल्यास राजकीय पक्षांनी आमची मते गृहीत धरू नये – उमरगा येथील बौद्ध मातंग चिंतन बैठकीत एकमुखी ठराव 

Advertisement


उमरगा – राजकारणात लातूर पॅटर्न राबवून मूळ हक्क असणाऱ्या जातींना प्रतिनिधीत्वापासून वंचित ठेवण्याचा कट सर्व राजकीय पक्ष करताना दिसत असून उमरगा विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडीकडून लातूर पॅटर्नचीं चर्चा रंगवली जात असून तसे झाले तर पुढील काळात मतदारसंघातील बौद्ध व मातंग समाजाची 50 हजारापेक्षा जास्त मतदान महाविकास आघाडीने गृहीत धरू नयेत असे एकमुखी ठराव रविवारी दि. 22 रोजी उमरगा येथील बौद्ध -मातंग समाज चिंतन बैठकीत करण्यात आला.
      शहरातील कैलास शिंदे मंगल कार्यालयात रविवारी बौद्ध मातंग समाज चिंतन बैठक मा. जि प सदस्य एस. के. चेले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी या बैठकीला जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती हरीश डावरे,जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, जेष्ठ नेते माजी जि प सदस्य दिलीप भालेराव, शिवसेनेचे अशोकराजे सरवदे,वंचितचे रामभाऊ गायकवाड,प्राचार्य श्रीकांत गायकवाड,संजय सरवदे ,डॉ. चंद्रशेखर गायकवाड,प्रा. रमेश पात्रे,दिलीप गायकवाड विजय तोरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकित महाविकास आघाडीकडून ज्या घटक पक्षाला ही जागा सुटणार आहे त्या पक्षाने जर तालुक्यात महत्वाच्या जाती असणाऱ्या तसेच 60 हजारहून जास्त मतदान असणाऱ्या बौद्ध,मातंग समाजाला डावलून उमेदवारी देऊ नये.लातूर पॅटर्न राबवून चुकीचा पायंडा राजकारणात आणण्याचा प्रस्थापित पक्ष जर करीत असतील तर त्यांना ही दलितांची मते गमवावी लागतील.सामाजिक व्यवस्थेत हजारो वर्षापासून ज्या जात वर्गावर अन्याय होत आला आहे. त्यांना समाजात बरोबरीचे स्थान मिळावे,राजकारणात अनु.जातीतील खऱ्या लाभाचा हक्क असणाऱ्या जातींना डावलवून अश्याच घुसखोरी करणाऱ्याना राजकारणात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जात आहे.खऱ्या लाभार्थ्यांना वचिंत ठेवण्याचे कटकारस्थान केले जात असून याला वेळीच रोखने गरजेचे बनले असल्याचे मत या बैठकीत बोलताना मान्यवरानी व्यक्त केले.यावेळी हरीश डावरे, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, अशोकराजे सरवदे, रामभाऊ गायकवाड,डॉ.श्रीकांत गायकवाड,प्रा.रमेश पात्रे, कमलाकर सूर्यवंशी आदिनी आपले मत मांडले. तर अध्यक्षीय समारोप एस. के. चेले यांनी आपले मत मांडून केले. यावेळी डॉ. चंद्रशेखर गायकवाड यांनी प्रस्ताविक केले तर सूत्रसंचालन केशव सरवदे यांनी केले तर आभार दत्ता रोंगे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »