एकोंडीच्या पोलीस पाटलांना जबरी मारहाण ; गुन्हा नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ ; उमरगा तालुक्यात वाढतोय गुन्हेगारीचा आलेख….


एकोंडीच्या पोलीस पाटलांना जबरी मारहाण ; गुन्हा नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ ; उमरगा तालुक्यात वाढतोय गुन्हेगारीचा आलेख…

पोलिसांचा धाकचं राहिला नाही 

 

उमरगा – शहरापासून जवळच असलेल्या एकोंडी जहागीर येथिल गाव कामगार पोलीस पाटील विठ्ठल राजेंद्र सुरवसे यांना मंगळवारी सायंकाळी गणेश मूर्तीच्या विसर्जना नंतर गावातील व्यक्तींनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.जखमी पोलीस पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात बुधवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गणेश विसर्जना दिवशी मंगळवारी दुपारी श्री. महाकाल बाल गणेश मंडळ व क्रांती सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक दुपारी एक वाजता सुरू झाली.त्यानंतर साडेचार वाजता अजितकुमार माधव गायकवाड यांनी पोलीस पाटील विठ्ठल सूरवसे यांना फोन केला व त्याचा आवाज ऐकू येत नसल्याने पाटील यांनी पुन्हा त्याला फोन केला.तेव्हा अजितकुमार यांनी फोन मध्ये म्हटले तू कोठे आहेस आम्हाला पोलीस ठाण्यात घालतो काय असे म्हणून तू प्लॉटवर ये तुला बघतो मी इथे रोडवर थांबलो आहे असे म्हणून फोन ठेवल्या नंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर किराणा दुकानाजवळ विठ्ठल गेले असता त्या ठिकाणी असलेले अजितकुमार माधव गायकवाड,माधव नामदेव गायकवाड, लता माधव गायकवाड,सुशीलकुमार माधव गायकवाड,कलाबाई शेषराव सूर्यवंशी, हे ही बसलेले होते.सदर ठिकाणी गेल्या नंतर अजितकुमार यानें विठ्ठल कडे पाहून बोलला तुझी पोलीस गाडी, तू लई माजलास का असे म्हणून त्याचे हातात कोयता कत्ती घेऊन विठ्ठलच्या अंगावर धावून गेला तो विठ्ठलला मारत असताना सदर कोयत्याच्या मुठीचा मार पाठीवर लागला त्या वेळी अशोक कांबळे हे त्या ठिकाणी आले व त्याचे हाताला धरून त्यास अडवले सुनीलकुमार गायकवाड याने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारून जखमी केले. त्याची आई वडील व आत्या यांनी फिर्यादीला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या वेळी गावातील झुंबर गुंडू गायकवाड यांनी सोडवा सोडवा केली अश्या फिर्याद दिल्या वरून अजितकुमार माधव गायकवाड, माधव नामदेव गायकवाड, लता माधव गायकवाड, सुशीलकुमार माधव गायकवाड, कलाबाई शेषराव सूर्यवंशी,यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९८ (२) १९१ (२) ,१९१(३)३९०(१) १९०,११८(१)११५(२)३५२,३५१(२)३५१(३) याकलमानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत.

Advertisement

दरम्यान गावातील सरपंच बाबासाहेब सोनकांबळे,शेखर सूर्यवंशी,विक्रम इंगळे, यांच्या सह गावातील वीस ते २५ नागरिक बुधवारी दिवसभर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी बसून होते.रात्री जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी पोलिसांना धारेवर धरताच गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आणि रात्री उशोरने गुन्हा दाखल झाला.दरम्यान पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनीही गुन्हा लवकर दाखल करण्यात यावा म्हणून जोर लावला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »