ईद – ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप…
ईद – ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप…
उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) मुळज रोड येथील उर्दू शाळेतील साधारण 40 गरजु विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख म्हणून आयुब भाई चिकनवाले, हाफिज यूसुफ, हाफिज समीर,हाफिज फैय्युम आदी मान्यवर उपस्थित होते.
एकुरगावाडी येथील मतीमंद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड.प्रवीण तोतला, माजी नगराध्यक्ष अब्दुल रज्जाक अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जाहेद मुल्ला, वसिम लदाफ, साजीद लदाफ, खलील शेख, गौस लंगडे, वहाब अत्तार, इरफान चौधरी, सरफराज बागवान, अमजद मणियार, अजहर शेख, मंजूर शेख, रियाज पंढरपूरे, वसीम बागवान, अल्लाउद्दीन शेख, मौला बागवान, हाफिज समिर, मुस्तफा लदाफ, फैजल शेख, आदिनी परिश्रम घेतले.