“डोळे वटारून का पाहिलास ?” असे म्हणत गुंजोटीत एकास मारहाण ; आठ जणावर गुन्हा दाखल…
“तू मला डोळे वटारून का पाहिलास ?” असे म्हणत गुंजोटीत एकास मारहाण ; आठ जणावर गुन्हा दाखल
उमरगा – गुंजोटी येथे एका तरुणास बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हादाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुंजोटी येथील रहिवासी असलेले एजाज अब्दुल हक्क काझी (वय २८) यांना ६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुंजोटी बाहेर पेठ येथे जब्बार शेख यांच्या किराणा दुकानासमोर आरोपींनी अडवले. “तू मला डोळे वटारून का पाहिलास ?” असे म्हणत आरोपींनी एजाज यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी, हंटर व बेल्टने मारहाण केली. या हल्ल्यात एजाज गंभीर जखमी झाले. यामुळे ७ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात एजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धिरज देशमुख, योगेश साखरे,आकाश देशमुख, धिरज कारभारी, सुरज देशमुख, प्रद्युन गंगाधर म्हेत्रे, बाळु व्यंकट पाटील, विशाल कारभारी (सर्व रा. गुंजोटी)या आठ जणांविरुद्ध भादंवि कलम १८९ (२), १९१(२), १९१(३),१९०, ११५(२), ११८(१), ३५२, अंतर्गत उमरगा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.