53 गावाचे आरक्षण निश्चित, 16 गावात महिलांना पोलीस पाटील होण्याची संधी…
उमरगा – लोहारा तालुक्यातील पोलिस पाटील पदाचे आरक्षण निश्चित
उमरगा – उमरगा – लोहारा तालुक्यातील ५३ गावातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाची भरती करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी ता. 5 रोजी शहरातील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या उपस्थितीत जातनिहाय व महिला आरक्षण निश्चित करण्यात आले.
उमरगा, लोहारा तालुक्यातील 53 गावात पोलिस पाटील यांची भरती करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी उमरग्याचे तहसीलदार गोविंद येरमे, लोहाऱ्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील, यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, सरपंच आदींची उपस्थिती होती.
गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती मुरळी, पारसखेडा,कलदेव निंबाळा,सावळसुर,उदतपूर (महिला)
अनुसूचित जमाती कोळेवाडी,राजेगाव,कोळसुर गु,कास्ती बु, औराद,एकोंडी वाडी,अनुसूचित जमाती महिला चंडकाळ, चिंचकोट,रामपूर
विशेष मागास प्रवर्ग बलसुर, तावशीगड,जकेकुर वाडी (महिला)
अंतर परावर्तित इतर मागास वर्ग
गुंजोटी वाडी,वागदरी,दाबका (महिला)
इतर मागास वर्ग –
केसर जवळगा,तोरंबा,आलूर,व्हताळ,काटेवाडी,काळ निंबाळा, सूंदर वाडी,तर जकेकुर,दुधनाळ,कुन्हाळी (इमाव महिला)
एसईबीसी – माकणी,नागुर,करजगाव,कास्ती खु,नागराळ गु (एसईबीसी महिला)
भटक्या जमाती ब चिंचोली काटे, समुद्राळ (भजब महिला)
भटक्या जमाती क- करवंजी, मार्डी (भजक महिला)
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक- तूगाव,येळी,बेंडकाळ,मातोळा,पळसगाव (आ दु घ महिला)
सर्वसाधारण बेलवाडी, आरणी, द जेवळी, इंगोले तांडा,नाईक नगर मु, आचार्य तांडा,विलासपुर पंढरी (महिला )कोळनूर पांढरी (महिला) चिंचोली जा (महिला)