उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातून निष्ठावंत शिवसैनिकाला मिळणार उमेदवारी …?
उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातून निष्ठावंत शिवसैनिकाला मिळणार उमेदवारी …?
एकनिष्ठ म्हणून गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर यांच्या नावाची चर्चा
उमरगा – लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना विधानसभेचे वेध लागले असून महायुती व महविकास आघाडीच्या वतीने आपापल्या परीने उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. उमरगा-लोहारा विधानसभा मदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हेच उमेदवार असतील यात शंका नाही मात्र महविकस आघाडीकडून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून १९९० पासून शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे काम करणारे गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांकडून जोर धरत आहे. २००९ साली शिवसेनेकडून उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर आमदार ज्ञानराज चौगुले आणि गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर हे दोनच उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी चौगुले यांना उमेदवारी जाहीर केली व विलास व्हटकर यांना पुढच्या वेळी संधी देण्यात येईल असे सांगण्यात आले. २०१४, २०१९ साली देखील पक्षाने विद्यमान म्हणून चौगुले यांची उमेदवारी कायम ठेवत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला. २०१९ ला विलास व्हटकर यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून उमेदवारीचे मागणी केली होती. तेंव्हाही विद्यमान आमदार म्हणून चौगुले यांनाच उमेदवारी देण्यात आली. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत व्हटकर यांनी तीन वेळेस उमेदवारी माघारी घेत पक्षाच्या कार्यात सक्रिय राहिले. चौगुले यांनी बंडखोरी करत शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाकडून विलास व्हटकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांमध्ये जोर धरत आहे. विलास व्हटकर यांचा उमरगा लोहारा विधानसभा मतदासंघात चांगला जनसंपर्क आहे. दोन्ही तालुक्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या अडचणीला धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मतदासंघात विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी जनतेच्या संपर्कात असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारात सभा घेत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. येथील प्रचार संपल्यानंतर दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या मतदारसंघात प्रचारार्थ सभा, कॉर्नर बैठका घेतल्या. त्यांचे अनिल देसाई यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खा. ओमराजे निंबाळकर, संपर्कप्रमुख सुनील काठमोरे, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना नेते बाबा पाटील यांचे ते विश्वासू असल्याचे सर्वश्रुत आहे. जिल्हासंघटक दीपक जवळगे, शेतकरीसेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उमरगा-लोहारा विधानसभाप्रमुख भगवान जाधव, उपजिल्हाप्रमुख सुरेश वाले, बसवराज वरणाळे, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक डी.के. माने, उमरगा शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, लोहारा शहरप्रमुख सलीम शेख, महेबुब गवंडी, जितेंद्र पोतदार, अप्पाराव गायकवाड, मारूती थोरे, दत्ता शिंदे यासारखी निष्ठावंत लोकांची साथ व्हटकर यांना आहे. सर्वांसाठी झोकून देवून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे जनतेत मिसळणार, शिवसैनिकांच्या अडी-अडचणीला धावून येणारा, तळागळातील सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा, हक्काचा उमेदवार म्हणून विलास व्हटकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकातून जोर धरत आहे.