उमरगा शहरात “ जाग ” या लघुचित्रपट निर्मिती…पोस्टरचे अनावरण…
उमरगा शहरात “ जाग ” या लघुचित्रपट निर्मिती.. पोस्टरचे अनावरण…
धाराशिव – उमरगा शहरातील ड्रीम क्रिएशन प्रस्तुत बालाजी सर्वसाने लिखित “ जाग ” ( एक नवीन सुरवात ) या लघुचित्रपट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या लघुचित्रपटाव्दारे NEET आणि JEE स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा अनावश्यक ताण, पालकांच्या आवाजवी अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या अक्षम्य चुका, त्यातून येणारे नैराश्य आणि त्यातून घडणाऱ्या दुर्दैवी घटना ही बाब चिंतनीय आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी जनजागृती व्हावी म्हणून केलेला एक छोटासा प्रयत्न उमरगा शहरातील ड्रिम क्रिएशन च्या टिमने केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांना वाव मिळावा यासाठी शैक्षणिक स्तरावर एकही लघुपट नव्हता तो सध्या तयार होऊन प्रसिध्दीसाठी सज्ज झाला आहे. बारावी नंतर पुढे काय या विषयावर सतत चर्चा केली जाते. दहावी व बारावी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी बहुसंख्य वाटा तयार असतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची माहिती नसते. नीट व जेईई म्हणजे काय हेच माहिती नसते. थोडी फार माहिती घेतली तरी यशस्वी होऊ शकत नाहीत. निराशेच्या गर्तेत राहून ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण अपूर्ण राहते. शिक्षण घेतले तरी यश मिळते का पदरी अपयश येत याच विचाराने मरगळलेल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा दाखविण्याचा प्रयत्न या लघुपटाद्वारे करण्यात आले आहे.