शिवज्ञान’ स्पर्धतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न… विद्यार्थ्यांचा झाला गौरव
शिवज्ञान’ स्पर्धतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न…
उमरगा : महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे व त्याचे अनुकरण केले पाहिजे. शिक्षण ही काळाची गरज असुन देशातील युवकांना उच्चशिक्षीत केल्याशिवाय आपण विकसित देशाची अपेक्षा करू शकत नाही. देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये युवकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. जग झपाट्यात बदलत असताना आपणही त्या वेगाने त्याबरोबर निकोप स्पर्धा करण्याची गरज असल्याचे मत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले.
मायक्रोकॉम कंम्प्युटर एज्युकेशन व रोटरी क्लब उमरगा आयोजीत तालुक्यातील ‘शिवज्ञान’ स्पर्धतील यशस्वी विद्यार्थ्यांचा शनिवारी (ता. २४) रोजी बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन रामकृष्ण बिराजदार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हा प्रमुख समशोद्दीन जमादार, रोटरी क्लब अध्यक्ष कमलाकर भोसले, सचिव शिवकुमार दळवी, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोने, मुख्याध्यापक पद्माकर मोरे उपस्थित होते.
श्री. साळूंके यांनी यांनी तर्कशुद्ध, सर्जनशील आणि स्वतंत्र विचारांना विचारपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. शिक्षणपध्दती काळानुसार व त्या-त्या वेळेच्या सामाजिक बदलत्या संरचनेनुसार बदलत असुन शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी ज्या महापुरुषांनी विशेष योगदान दिलेले आहे ते असामान्यच आहे असे त्यांनी सांगितले.
श्री. भोसले यांनी आपल्या देशात जगासोबत स्पर्धा करायची झाल्यास युवकांना सक्षम केले पाहीजे. असे त्यांनी सांगितले. रामकृष्ण बिराजदार, मनोज गुरव यांचे भाषण झाले. यावेळी तालुक्यातील २२ शाळेतील २००० विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. त्यातील प्रत्येक शाळेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रा. युसुफ मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल जाधव व पुजा माने यांनी सुत्रसंचलन केले. पुजा वाले यांनी आभार मानले. सुमय्या जमादार, रमेजा मोमीन, मंजु माने, प्रदीप साळंके, इरफान मुल्ला, कार्तीक रजपुत यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी तालुक्यातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शाळेतील विद्यार्थ्यांचा झाला गौरव:- महात्मा गांधी विद्यालय डिग्गी , स्वामी विवेकानंद विद्यालय त्रिकोळी, जिजामाता माध्यमिक विद्यालय उमरगा, महात्मा गांधी विद्यालय उमरगा, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड, श्री. सिद्धेश्वर विद्यालय कसगी, श्री भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालय येळी , श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय उमरगा, जिल्हा परिषद प्रशाला मुळज, कै शिवरामपंत चालुक्य कुन्हाळी, माधवी चालुक्य कन्या हायस्कूल उमरगा, ग्रामीण प्रशाला माडज, भारत विद्यालय बेडगा, श्री. ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी, लोकमान्य टिळक कदेर, भारत विद्यालय उमरगा, जिल्हा परिषद प्रशाला उमरगा, कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा, आदर्श विद्यालय उमरगा, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय जेकेकुर, श्री. शिवशक्ती विद्यालय एकूरगा