उमरगा तालुका राष्ट्रवादीचे छ .शिवाजी महाराजांना अभिवादन…
उमरगा तालुका राष्ट्रवादीचे छ .शिवाजी महाराजांना अभिवादन…
उमरगा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमरगा येथील पुतळ्यास युवा नेते रामकृष्ण सुरेश बिराजदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नाना माने, तालुका कार्याध्यक्ष शंतनू सगर ,शहराध्यक्ष सुशील दळगडे, विपुल हराळकर ,तालुका सरचिटणीस धीरज बेळंबकर, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, सुशील जाधव, सागर सोनवणे ,संतोष शिरगुरे, आधी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान रामकृष्ण बिराजदार यांनी उमरगा शहरातील आरंभ प्रतिष्ठान येथील शिवजन्मोत्सव सोहळ्यास भेट देवून छत्रपतींना अभिवादन केले.