शरद पवारांना धक्का, अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष…
शरद पवारांना धक्का, अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष; विधानसभा अध्यक्षांची घोषणा
मुंबई – राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला आहे.
राष्ट्रवादी कुणाची हे ठरविताना विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं सांगत अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा असल्याने अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
त्याचवेळी अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणीही नार्वेकर यांनी फेटाळून लावली असून आता अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत.
त्याचवेळी अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणीही नार्वेकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत असे यावेळी नार्वेकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, या निकालानंतर असे लक्षात येते कि शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई सध्यातरी अजितदादांनी जिंकली आहे.