रिपब्लिकन पार्टीच्या शाखेचे पुनरुज्जीवन करून आपल्या सामाजिक चळवळीचे चक्र गतिमान करावे – राजाभाऊ ओव्हाळ


रिपब्लिकन पार्टीच्या शाखेचे पुनरुज्जीवन करून आपल्या सामाजिक चळवळीचे चक्र गतिमान करावे- राजाभाऊ ओव्हाळ

Advertisement

उमरगा –  भारतीय दलित पँथरच्या धर्तीवर गावागावात आपली चळवळ गतिमान करून गाव तेथे रिपब्लिकन पार्टीच्या शाखेचे पुनरुज्जीवन करून आपल्या सामाजिक चळवळीचे चक्र गतिमान करावे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जाती अंताची लढाई लढण्यासाठी गावागावात नव्या जोमाने काम करावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी केले.
        शहरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी(दि.१५) रोजी रिपब्लिकन पार्टीच्या(आठवले) गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती (दि.२६) फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले धाराशिव येथे येत असल्याने कार्यकर्ता शिबिर होत आहे त्या करिता ही बैठक घेण्यात आली या वेळी ओव्हाळ बोलत होते.
        या वेळी रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य एस.के.कांबळे(चेले) रिपाइंचे नेते हरिष डावरे,तालुका अध्यक्ष दगडू भोसले,सुभाष सोनकांबळे,शहर अध्यक्ष दीपक झाकडे,महिला आघाडी अध्यक्ष आशाताई कांबळे यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना ओव्हाळ म्हणाले की उमरगा तालुका हा पँथर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून सर्वत्र ओळखला जातो.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवले साहेबांनी जिल्हा कार्यकारणी कार्यरत ठेवली आहे.पक्षासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आपली पँथर सिस्टम राबवून चळवळ जिवंत ठेवली पाहिजे गावा गावात मिटींग घेऊन पक्ष जिवंत ठेवण्यासाठी काम करावे
    प्रत्येक कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा काढून शाखेचे पुनर्गठन करावे आपली चळवळ बळकट आहे केवळ आपल्या लहान सहन चुका मुळे कार्यकर्ता नाराज होत आहे. त्याला सांभाळणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.या वेळी एस.के.कांबळे (चेले)  यांनी पक्ष बांधणी साठी नव्या जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिष डावरे यांनी केले.या वेळी शहाजी मस्के,बाबा गायकवाड,मारुती कांबळे,उषा खंडांगळे, छाया कांबळे,महादू गायकवाड,कीर्तीकुमार गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »