टँकरच्या धडकेत विद्यार्थीनी जागीच ठार तर एक गंभीर जखमी…
टँकरच्या धडकेत विद्यार्थीनी जागीच ठार तर एक गंभीर जखमी
उमरगा – राष्ट्रीय महामार्गावर येणेगुर गावात टँकरने धडक दिल्यामुळे एका शाळकरी विद्यार्थ्यांचा जागी मृत्यू झाला तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले आहे ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ट वसंत गतीने होत असल्यास असल्याने ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर आज सात तास रास्ता रोको आंदोलन केले.
या गावातील सातवीतील विद्यार्थिनी श्रेया सुरेश पात्रे ही जागीच मरण पावली तर श्रद्धा श्रीकांत कांबळे ही गंभीर जखमी झाल्याने तिला सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थिनी शाळेला पायी चालत जात होत्या. या अपघानंतर टँकर चालकास ग्रामस्थांनी चांगला चोप दिला हे काम निकृष्ट वसंत गतीने होत असल्याच्या आरोप करीत ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक दिवसभर पूर्ण ठप्प झाली होती. संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल करावा व रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ अशी लेखी आश्वासन दिल्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास हे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे येणेगूर गाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.